छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): चिकलठाणा परिसरातील जालना रोडवर इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेत महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी निष्काळजीपणा व बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावित्रीनगरसमोरील आठवडी बाजार परिसरात मोहम्मद मुस्तफा खान यांच्याकडून उभारल्या जाणाऱ्या ४ हजार वर्ग फूट इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. घटनेच्या वेळी १६ कामगार कार्यरत होते. त्यापैकी तीन कामगारांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर
उडी मारल्याने प्राण वाचले, तर अंकुश कांबळे आणि अशपाक शेख हे जखमी झाले. मात्र, साईनगर येथील रहिवासी कामगार खांडू वितनवरे ढिगाऱ्याखाली
अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी सिडको पोलीस, अग्निशमन दल आणि मनपा प्रशासनाने सलग २५ तास अथक प्रयत्न करून संपूर्ण
अनधिकृत बांधकामे रडारवर
▶ मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित इमारतीचे बांधकाम अनधिकृत केले जात होते. जवळच विहीर असतानाही निष्काळजीपणे बांधकाम सुरू होते. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मोहीम एका आठवड्याच्या आत सुरू केली जाईल. महापौर समीर राजूरकर यांनीही मनपा अधिकाऱ्यांना बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
ढिगारा आणि सळ्या हटवल्या, परंतु खांडू वितनवरे यांचा काहीच पत्ता लागला नाही. इमारतीच्या कोफ्यात असलेल्या विहिरीत ते पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, आता नाशिकहून एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
महापौर समीर राजूरकर यांच्या निर्दे
शानंतर नगररचना विभागाने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मनपाने २०१९-२० मध्ये केवळ ५५ वर्ग मीटर क्षेत्रात शोरूमसाठी एका वर्षाची परवानगी दिली होती. मुदत संपलेली असतानाही सर्रास ४ हजार वर्ग फूट क्षेत्रात हे अवैध बांधकाम सुरू होते.
https://epaper.sanjwarta.ini
Powered By: Vrudhee Solutions















